RTI व सरकारी तक्रारी RTI & Government Records

१४ तक्रारी. ४ RTI अर्ज. तालुका ते विभागीय आयुक्त स्तरापर्यंत वेगवेगळ्या सरकारी कार्यालयांकडे. एकदाही समाधानकारक उत्तर आलं नाही. हे सर्व अधिकृत नोंदींसह येथे दस्तऐवजीकरण केले आहे. 14 complaints. 4 RTI applications. Filed across offices from Taluka to Divisional Commissioner level. Not once received a satisfactory response. All documented here with official records.

१४
Aaple Sarkar तक्रारी
Aaple Sarkar Complaints
RTI अर्ज
RTI Applications
पूर्वी बंद करण्यात आलेल्या
Previously Closed
समाधानकारक उत्तरे
Satisfactory responses
कार्यालये, एकच शब्दशः उत्तर
Offices, one near-identical answer

तक्रार → दुर्लक्ष → बंद → पुन्हा तक्रार Complaint → Ignored → Closed → Re-filed

हे केवळ एका तक्रारीचं उत्तर न येण्याचं प्रकरण नाही. प्रत्येक वेळी तक्रार दाखल केली — ती एक तर उत्तराशिवाय बंद केली गेली, किंवा "Resolved" असं mark केलं गेलं — मूळ प्रश्नाला हात न लावता. हे एक स्पष्ट pattern आहे.

This is not merely a case of one unanswered complaint. Every time a complaint was filed — it was either closed without response, or marked "Resolved" — without touching the core issue. This is a clear pattern.

TAL/REVD/MUKT/2026/1 — दाखल केली. उत्तर नाही.

TAL/REVD/MUKT/2026/1 — Filed. No response.

DIS/REVD/JALG/2026/123 — दाखल केली. मूळ प्रश्नाला उत्तर न देता "Resolved" केली.

DIS/REVD/JALG/2026/123 — Filed. Marked "Resolved" without answering the core issue.

TAL/REVD/MUKT/2026/3 — पुन्हा दाखल केली. पुन्हा उत्तराशिवाय बंद.

TAL/REVD/MUKT/2026/3 — Re-filed. Again closed without response.

TAL/REVD/MUKT/2026/4 — पुन्हा दाखल केली. अजून प्रतीक्षा.

TAL/REVD/MUKT/2026/4 — Re-filed again. Still waiting.

२३–२४/०६/२०२६ — दोन वेगवेगळ्या कार्यालयांकडून जवळपास शब्दशः एकसारखी उत्तरे — मूळ मोजणी प्रश्नाला स्पर्श न करता. तपशील खाली पहा →

23–24/06/2026 — Two separate offices issue near-identical responses — the core demarcation question untouched. Details below →

२४/०६ – ०३/०७/२०२६ — TAL/REVD/MUKT/2026/5 व /6 सह १० अधिक तक्रारी संपूर्ण महसूल साखळीत (तालुका → जिल्हा → उपविभाग → आयुक्त → विभागीय आयुक्त) दाखल — तरीही त्या जागी अद्याप एकही निष्पक्ष चौकशी झालेली नाही. DySLR व तहसीलदार कार्यालय तोच PDF अपलोड करून सर्व तक्रारी बंद करत असल्याने वरिष्ठांची दिशाभूल होत असल्याची शंका निर्माण होते. ही चौकशी वरिष्ठ स्तरावरील पथकानेच करावी अशी अर्जदाराची इच्छा आहे — स्थानिक स्तरावरील अधिकारी "मॅनेज" असल्याची शंका उपस्थित झाली आहे.

24/06 – 03/07/2026 — 10 further complaints filed across the entire revenue hierarchy (Taluka → District → Sub-Division → Commissioner → Divisional Commissioner), including TAL/REVD/MUKT/2026/5 and /6 — yet no impartial, on-ground investigation has taken place to date. Because DySLR and the Tahsildar's office are closing all complaints by uploading the same PDF, a doubt arises that senior officers are being kept misled. The applicant's wish is that this inquiry be conducted specifically by a senior-level team — a suspicion has arisen that the local-level officer is being "managed."

१४ तक्रार टोकन — संपूर्ण महसूल साखळीत 14 Complaint Tokens — Across the Entire Revenue Hierarchy

खाली दिलेली यादी आपले सरकार पोर्टलवरील सर्व टोकन क्रमांक, सद्यस्थिती व स्तर दर्शवते — तालुका कार्यालयापासून विभागीय आयुक्त, नाशिक कार्यालयापर्यंत.

The list below shows every token number, current status, and hierarchy level from the Aaple Sarkar portal — from the Taluka office up to the Divisional Commissioner, Nashik.

प्रलंबित / महत्त्वाच्या तक्रारी (उच्चस्तरीय साखळी)
Pending / Important Complaints (Higher-Level Chain)
DIS/REVD/JALG/2026/136 Submitted
DIS/REVD/JALG/2026/134 Forwarded For Input
DIS/REVD/JALG/2026/132 Submitted
DIV/REVD/NASH/2026/209 Submitted
COM/REVD/2026/613 Reassigned
SUB/REVD/BHUS/2026/2 Reassigned
मुक्ताईनगर संबंधित तक्रारी
Muktainagar-Related Complaints
TAL/REVD/MUKT/2026/1 Appealed
TAL/REVD/MUKT/2026/4 Appealed
TAL/REVD/MUKT/2026/5 Appealed
TAL/REVD/MUKT/2026/6 Submitted
पूर्वी बंद करण्यात आलेल्या तक्रारी
Previously Closed Complaints
TAL/REVD/MUKT/2026/2 Closed
TAL/REVD/MUKT/2026/3 Closed
DIS/REVD/JALG/2026/121 Closed
DIS/REVD/JALG/2026/123 बंद → आता पुन्हा Reassigned Closed → Now Reassigned Again
सातत्याने आढळणारा मुद्दा
The Recurring Issue

अर्जदाराने उपस्थित केलेल्या मूळ मुद्द्यांवर उत्तर न देता समान उत्तरपत्र अपलोड करून तक्रारी निकाली काढण्यात येत असल्यामुळे स्थानिक स्तरावरील कार्यवाहीबाबत गंभीर शंका निर्माण झाली आहे.

By closing complaints through the upload of an identical response letter — without addressing the core issues raised by the applicant — serious doubts arise regarding the conduct of proceedings at the local level.

ठळक तक्रारी — संपूर्ण तपशील (१४ पैकी ४) Featured Complaints — Complete Details (4 of 15)

खालील ४ तक्रारींची संपूर्ण कथा — विषय, कार्यालय व परिणाम — उपलब्ध आहे. वरील तक्रार नोंदीमध्ये उर्वरित ११ टोकन क्रमांकांची सद्यस्थिती दिली आहे.

The complete story — subject, office, and outcome — is available for the 4 complaints below. Current status for the remaining 11 tokens is listed in the complaint log above.

TAL/REVD/MUKT/2026/1
दि. ०९/०६/२०२६ · १०:१४ PM
Dt. 09/06/2026 · 10:14 PM
उत्तराशिवाय "Resolved" Marked "Resolved" Without Answering
कार्यालय: तहसीलदार कार्यालय (महसूल), मुक्ताईनगर (एडलाबाद) · Officer Desk: Tahsildar, Muktainagar
Office: Taluka Office (Revenue), Muktainagar (Edlabad) · Officer Desk: Tahsildar, Muktainagar
विषय: पुनर्वसन टप्पा २, प्लॉट क्र. ७३ वरील संभाव्य अतिक्रमणाबाबत चौकशी, अधिकृत मोजणी व आवश्यक कार्यवाही करण्याबाबत
मूळ प्रश्नाला उत्तर न देता तक्रार "Resolved" असे mark केली गेली. अतिक्रमण, मोजणी — कशाचेही उत्तर नाही. Complaint marked "Resolved" without answering the core question. No response on encroachment or survey — the issues actually raised.
DIS/REVD/JALG/2026/123
दि. ३०/०६/२०२६ · १२:०५ PM
Dt. 30/06/2026 · 12:05 PM
उत्तराशिवाय "Resolved" Falsely "Resolved"
कार्यालय: तालुका कार्यालय (जमीन नोंद), मुक्ताईनगर · Officer Desk: Deputy Superintendent, Muktainagar
Office: Taluka Office (Land Record), Muktainagar · Officer Desk: Deputy Superintendent, Muktainagar
विषय: दिनांक २७/११/२०२० रोजी गट क्र. ७४ / मो.र.क्र. ७४५ संदर्भात झालेल्या मोजणी कार्यवाहीबाबत अभिलेखीय चौकशी करण्याबाबत
Subject: Documentary inquiry regarding survey proceedings of Gut No. 74 / M.R. No. 745 dated 27/11/2020
मूळ प्रश्नाला उत्तर न देता "Resolved" असे mark केले गेले. हे स्वीकारार्ह नाही. त्यामुळे पुढील तक्रार TAL/REVD/MUKT/2026/3 दाखल केली. Marked "Resolved" without answering the core issue. This is unacceptable. Hence fresh complaint TAL/REVD/MUKT/2026/3 was filed.
TAL/REVD/MUKT/2026/3
दि. १९/०६/२०२६ · १०:३४ PM
Dt. 19/06/2026 · 10:34 PM
उत्तराशिवाय बंद Closed Without Response
कार्यालय: जिल्हा कार्यालय (जमीन नोंद), जळगाव · Officer Desk: District Superintendent, Land Records, Jalgaon
Office: District Office (Land Record), Jalgaon · Officer Desk: District Superintendent, Land Records, Jalgaon
विषय: मो.र.क्र. ७४५, गट क्र. ७४ च्या दि. २७/११/२०२० रोजी झालेल्या मोजणीबाबत हरकत अर्ज व सदर मोजणीवरील अहवाल रद्द करण्याबाबत विनंती
Subject: Objection application and request to cancel report on survey M.R. No. 745, Gut No. 74 dated 27/11/2020
मागील तक्रार DIS/REVD/JALG/2026/123 मध्ये माझ्या मुख्य प्रश्नांचे समाधानकारक उत्तर न मिळाल्याने ही नवीन तक्रार.
Fresh complaint filed as previous complaint DIS/REVD/JALG/2026/123 did not receive satisfactory answers.
पुन्हा मूळ प्रश्नांची निराकरण न करता बंद. त्यामुळे TAL/REVD/MUKT/2026/4 दाखल केली. Again closed without resolving core questions. Hence TAL/REVD/MUKT/2026/4 was filed.
TAL/REVD/MUKT/2026/4
दि. २४/०६/२०२६ · ०३:२८ PM
Dt. 24/06/2026 · 03:28 PM
प्रतीक्षा सुरू Awaiting Response
कार्यालय: तालुका कार्यालय (जमीन नोंद), मुक्ताईनगर · Officer Desk: Deputy Superintendent, Muktainagar
Office: Taluka Office (Land Record), Muktainagar · Officer Desk: Deputy Superintendent, Muktainagar
विषय: मो.र.क्र. ७४५, गट क्र. ७४ च्या दि. २७/११/२०२० रोजी झालेल्या मोजणीची चौकशी व तक्रार क्र. TAL/REVD/MUKT/2026/3 मधील अपूर्ण उत्तराबाबत
Subject: Inquiry into survey M.R. No. 745, Gut No. 74 dated 27/11/2020 and incomplete response in TAL/REVD/MUKT/2026/3
TAL/REVD/MUKT/2026/3 मध्ये माझ्या मुख्य प्रश्नांची निराकरण झाली नाही.
TAL/REVD/MUKT/2026/3 did not resolve core questions.
उत्तराची प्रतीक्षा सुरू आहे. Awaiting response.
महत्त्वाची नोंद — भौतिक तक्रार
Important Note — Physical Complaint

दि. ०६/०४/२०२६ रोजी तहसीलदार कार्यालयात भौतिक (Physical) स्वरूपात तक्रार दाखल केली. स्टँप-सर्टिफाइड प्रत आमच्याकडे आहे. आजपर्यंत कोणताही प्रतिसाद नाही.

A physical complaint was filed at the Tehsildar office on 06/04/2026. Stamp-certified copy is in our possession. No response received to date.

DySLR जळगाव व उप अधीक्षक भूमी अभिलेख, मुक्ताईनगर — जवळपास शब्दशः एकसारखी उत्तरे DySLR Jalgaon & Deputy Superintendent, Muktainagar — Near-Identical Written Responses

२३ आणि २४ जून २०२६ रोजी — एका दिवसाच्या अंतराने — दोन वेगवेगळ्या कार्यालयांनी आपले सरकार पोर्टलवरील तक्रारींना लेखी उत्तरे दिली. दोन्ही पत्रांत एकाच व्यक्तीला संबोधित केले आहे, एकाच दोन संदर्भ तारखा नमूद आहेत (अर्ज १०/०६/२०२६, तक्रार १९/०६/२०२६), आणि दोन्हीत तेच आठ प्रश्न — त्याच क्रमाने, जवळपास त्याच शब्दांतील उत्तरांसह — पुनरावृत्त झाले आहेत. फक्त स्वाक्षरी करणारा अधिकारी आणि तारीख वेगळी आहे.

On 23 and 24 June 2026 — a day apart — two separate offices issued written responses to grievances filed on the Aaple Sarkar portal. Both letters address the same recipient, cite the same two reference dates (application 10/06/2026, complaint 19/06/2026), and reproduce the identical set of eight questions, in the same order, with near-identical wording. Only the signing officer and date differ.

जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख (DySLR), जळगाव
दि. २४/०६/२०२६ · स्वाक्षरी: काशिनाथ महादू मोरे
Dt. 24/06/2026 · Signed: Kashinath Mahadu More
८ प्रश्न, केवळ ULPIN-केंद्रित 8 Questions, ULPIN-Only Focus
क्र.शिरस्ते/तक्रार/आपले सरकार पोर्ट-मुक्ताईनगर/२०२६ — पुनर्वसन टप्पा क्र. २ मधील प्लॉट नं. ७३ चे मोजणी बाबत
Ref: क्र.शिरस्ते/तक्रार/आपले सरकार पोर्ट-मुक्ताईनगर/२०२६ — Re: survey of Plot No. 73, Punarvasan Tappa 2
उप अधीक्षक भूमी अभिलेख, मुक्ताईनगर
दि. २३/०६/२०२६ · स्वाक्षरी: वंदन विठ्ठल जाधव
Dt. 23/06/2026 · Signed: Vandan Vitthal Jadhav
८ प्रश्न, केवळ ULPIN-केंद्रित 8 Questions, ULPIN-Only Focus
क्र/भुमापन/मौजे मु.नगर/ग नं ७३/टप्पा क्र २/२०२६ — पुनर्वसन टप्पा क्र. २ मधील प्लॉट नं. ७३ चे मोजणी बाबत
Ref: क्र/भुमापन/मौजे मु.नगर/ग नं ७३/टप्पा क्र २/२०२६ — Re: survey of Plot No. 73, Punarvasan Tappa 2
मूळ प्रश्न कुठे गेला?
Where Did the Actual Question Go?

दोन्ही पत्रांतील सर्व आठ प्रश्न-उत्तरे केवळ ULPIN निर्मिती व डिजिटल भूमि अभिलेख एकत्रीकरणाच्या तांत्रिक स्थितीबाबत आहेत. मूळ अर्जात (१०/०६/२०२६) व तक्रारीत (१९/०६/२०२६) उपस्थित केलेला खरा प्रश्न — शेजारील गट क्र. ७२ व ७४ द्वारे प्लॉट क्र. ७३ वर होणारे अतिक्रमण दूर करण्यासाठी आवश्यक मोजणी (सीमांकन) — या दोन्हीपैकी एकाही उत्तरात नमूद नाही. दुसऱ्या शब्दांत, विचारलेला प्रश्न टाळून एका वेगळ्याच, मर्यादित तांत्रिक प्रश्नाचे उत्तर देऊन तक्रार निकाली काढण्यात आली.

All eight question-answer pairs in both letters concern only the technical status of ULPIN generation and digital land-record integration. The actual question raised in the original application (10/06/2026) and complaint (19/06/2026) — the demarcation survey (मोजणी) needed to resolve encroachment on Plot No. 73 by adjoining Gut No. 72 and 74 — is not addressed in either response. In effect, the complaint was closed by answering a narrower, unrelated technical question instead of the one actually asked.

हे दस्तऐवज सार्वजनिकरित्या नोंदवत आहोत जेणेकरून हे प्रकरण पाहणारे वरिष्ठ अधिकारी — विभागीय आयुक्त, नाशिक यांच्या कार्यालयासह — तालुका व जिल्हा स्तरावरील उत्तरे मूळ तक्रारीशी खरोखर संबंधित आहेत का, हे मूळ कागदपत्रांवरून स्वतः पडताळू शकतील.

This is being documented publicly, with the original letters, so that senior authorities reviewing this matter — including the Divisional Commissioner, Nashik's office — can independently verify from the source documents whether the taluka- and district-level responses actually engage with the complaint that was filed.

तक्रारींच्याच अधिकृत नोंदीत नमूद — "तेच PDF वारंवार" Recorded in the Complaints' Own Official Log — "Same PDF, Repeatedly"

हा दावा नंतर, प्रचारासाठी उपस्थित केलेला नाही. अर्जदाराने आपले सरकार पोर्टलवरील "Appeal Reason" रकान्यात — प्रत्येक तक्रार दाखल करतानाच, त्या-त्या वेळी — हा नमुना स्वतः नोंदवला आहे. खाली त्या नोंदी जशाच्या तशा, टोकन क्रमांक व वेळ-तारखेसह दिलेल्या आहेत — ही सरकारच्याच पोर्टलवरील नोंद आहे, वेबसाईटवर नंतर जोडलेला दावा नाही.

This is not a claim raised afterward for the campaign. The applicant recorded this pattern himself, in real time, in the "Appeal Reason" field of the Aaple Sarkar portal at the moment each complaint was filed. Below are those entries, verbatim, with token number and timestamp — this is the government's own portal record, not something added to the website after the fact.

TAL/REVD/MUKT/2026/1 19/06/2026 · 10:14 PM · Appealed
"तक्रार केवळ 'भूमी अभिलेख कार्यालयाशी संपर्क साधावा' या कारणावरून निकाली. माझ्या मूळ तक्रारीतील प्रश्न आजही अनुत्तरित असून अतिक्रमणाची समस्या कायम आहे."
"Complaint closed merely citing 'contact the land records office.' The questions in my original complaint remain unanswered to date and the encroachment problem persists."
TAL/REVD/MUKT/2026/3 19/06/2026 · 10:34 PM · Closed without proper resolution
"बंद: DySLR उत्तर — तेच PDF. अपील बंद: DySLR चेच PDF पुन्हा अपलोड करून."
"Closed: DySLR response — same PDF. Appeal closed: by re-uploading the same DySLR PDF."
TAL/REVD/MUKT/2026/4 24/06/2026 · 03:28 PM · Appealed
"DySLR Uploading Same pdf without solving actual asked question in complaint"
(पोर्टलवरील अधिकृत "Appeal Reason" रकान्यातील शब्दशः नोंद)
(verbatim entry in the portal's official "Appeal Reason" field)
TAL/REVD/MUKT/2026/5 30/06/2026 · 07:34 PM · Appealed
"DySLR Uploading Same pdf without solving actual asked question in complaint"
(पोर्टलवरील अधिकृत "Appeal Reason" रकान्यातील शब्दशः नोंद)
(verbatim entry in the portal's official "Appeal Reason" field)
DIS/REVD/JALG/2026/134 30/06/2026 · 08:15 PM · Forwarded For Input
"DySLR Uploading Same pdf without solving actual asked question in complaint"
(पोर्टलवरील अधिकृत "Appeal Reason" रकान्यातील शब्दशः नोंद)
(verbatim entry in the portal's official "Appeal Reason" field)
हा योगायोग का नाही
Why This Isn't Coincidence

वरीलपैकी ३ स्वतंत्र नोंदी — तीन वेगळ्या तारखांना (२४/०६ आणि ३०/०६ रोजी दोनदा, दोन वेगळ्या कार्यालयांविरोधात) — शब्दशः एकच निरीक्षण अधिकृत सरकारी पोर्टलवर नोंदवतात: DySLR कार्यालय तोच PDF पुन्हा अपलोड करून, विचारलेल्या मूळ प्रश्नाचे उत्तर न देता तक्रार निकाली काढत आहे. एकाच व्यक्तीने, तीन वेगळ्या प्रसंगी, तीन वेगळ्या तक्रार क्रमांकांखाली, एकच निरीक्षण नोंदवणे हा एक सुसंगत व सत्यापित करण्यायोग्य नमुना आहे — केवळ एक-वेळचा अनुभव नाही.

Three of the entries above — across three separate dates (24/06 and twice on 30/06, against two different offices) — record, in almost identical wording, the same observation on the official government portal: that the DySLR office was closing complaints by re-uploading the same PDF without answering the actual question asked. The same person recording the same observation on three separate occasions, under three separate complaint numbers, is a consistent and verifiable pattern — not a one-off experience.

अजूनही अनुत्तरित मुद्दे
Points That Remain Unanswered

या पुनरावृत्त तक्रारींमध्ये उपस्थित केलेले विशिष्ट प्रश्न — ज्यांना आजतागायत कोणत्याही अधिकृत पत्रात स्पष्ट उत्तर मिळालेले नाही:

The specific questions raised across these repeated complaints — none of which have received a clear written answer in any official letter to date:

• मो.र. क्र. ७४५, गट क्र. ७४ ची मोजणी (दि. २७/११/२०२०) प्रत्यक्षात गट क्र. ७४ साठी होती की पुनर्वसन टप्पा २ मधील प्लॉट क्र. ७४ साठी — व त्यासाठी कोणता अभिलेखीय आधार वापरण्यात आला.
• अर्जदाराला त्या मोजणीत "लगतधारक" म्हणून कोणत्या अभिलेखाच्या आधारे नमूद करण्यात आले, आणि नोटीस प्रत्यक्ष का बजावण्यात आली नाही.
• DySLR कार्यालयाच्या स्वतःच्या उत्तरानुसार पुनर्वसन टप्पा २ मधील स्वतंत्र प्लॉटची मोजणीच होत नसताना, ही विशिष्ट मोजणी कोणत्या आधारावर करण्यात आली.
• मोजणी क्र. ७४५ चा अंतिम अहवाल, नकाशा व फील्ड बुक विभागाच्या नोंदीत अस्तित्वात आहे किंवा नाही.

• Whether the survey under M.R. No. 745, Gut No. 74 (dated 27/11/2020) was actually for Gut No. 74 or for Plot No. 74 in Punarvasan Tappa 2 — and what record was used to establish that.
• On what record basis the applicant was listed as an "adjoining holder" in that survey, and why no notice was actually served.
• Given DySLR's own stated position that individual plots in Punarvasan Tappa 2 have not been separately surveyed, on what basis this specific survey was conducted.
• Whether the final report, map, and field book for Survey No. 745 exist in departmental records at all.

सातत्याने आढळणारा मुद्दा
The Recurring Issue

अर्जदाराने उपस्थित केलेल्या मूळ मुद्द्यांवर उत्तर न देता समान उत्तरपत्र अपलोड करून तक्रारी निकाली काढण्यात येत असल्यामुळे स्थानिक स्तरावरील कार्यवाहीबाबत गंभीर शंका निर्माण झाली आहे.

By closing complaints through the upload of an identical response letter — without addressing the core issues raised by the applicant — serious doubts arise regarding the conduct of proceedings at the local level.

४ RTI अर्ज — एक Appeal टप्प्यात, तिन्ही अजूनही उत्तराशिवाय 4 RTI Applications — One Now in Appeal, Three Still Without Response

माहिती अधिकार अधिनियम २००५ अंतर्गत ४ अर्ज दाखल केले. महाराष्ट्र RTI नियम २०२६ नुसार उत्तर देणे बंधनकारक आहे. आजपर्यंत एकाही अर्जाला मूळ मागितलेली माहिती मिळालेली नाही — एका अर्जाला (RA&FD/R/2026/62579) उत्तर देण्याऐवजी transfer व offline कडे बोळवण करण्यात आली, त्यामुळे त्याविरोधात आता अपील दाखल आहे.

4 applications filed under the Right to Information Act 2005. Response is mandatory under Maharashtra RTI Rules 2026. Not a single application has received the information actually requested to date — one application (RA&FD/R/2026/62579) was, instead of being answered, transferred and pushed toward offline filing, so an appeal against it is now pending.

RA&FD/R/2026/62334
दि. ०५/०६/२०२६
Dt. 05/06/2026
उत्तर नाही No Response
विभाग: महसूल व वनविभाग (Revenue and Forest Department) · SPIO: SPIO DESK L1
Department: Revenue and Forest Department · SPIO: SPIO DESK L1
मोजणी नोंदणी क्र. ७४५, गट क्र. ७४ — दि. २७/११/२०२० रोजी झालेल्या मोजणीची सर्व कागदपत्रे
All documents of Survey Registration No. 745, Gut No. 74 — survey dated 27/11/2020
JGCLO/R/2026/60303
दि. १०/०६/२०२६
Dt. 10/06/2026
उत्तर नाही No Response
विभाग: जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव (Collector Office) · SPIO: C D Wankhede (Resettlement)
Department: Collector Office, Jalgaon · SPIO: C D Wankhede (Resettlement)
पुनर्वसन टप्पा २, मुक्ताईनगर — सर्व नकाशे, भूखंड क्रमांक व इतर दस्तऐवज
RA&FD/R/2026/62579
दि. १८/०६/२०२६
Dt. 18/06/2026
Transferred → आता Appealed Transferred → Now Appealed
विभाग: महसूल व वनविभाग · SPIO: SPIO DESK J&A
Department: Revenue and Forest Department · SPIO: SPIO DESK J&A
पुनर्वसन टप्पा २, प्लॉट क्र. ६९, ७०, ७१, ७२, ७४ व ७५ — १९९० पासून आजपर्यंत झालेल्या सर्व अधिकृत मोजण्यांची माहिती
Punarvasan Tappa 2, Plot No. 69, 70, 71, 72, 74 and 75 — details of all official surveys from 1990 to date
हा अर्ज पहिल्यांदा RA&FD/R/2026/62579 म्हणून दाखल केला, तो पुढे JGCLO/R/2026/80054 कडे transfer करण्यात आला. त्यानंतर जळगाव कार्यालयाच्या अधिकाऱ्याने असे नमूद केले की — "संबंधित कार्यालय RTI Online पोर्टलच्या यादीत जोडलेले नाही; अर्जदाराने संबंधित सार्वजनिक प्राधिकरणाकडे तोच अर्ज प्रत्यक्ष/ऑफलाइन पद्धतीने करावा." या उत्तराविरोधात आता JGCLO/A/2026/60051 या क्रमांकाने अपील दाखल करण्यात आले आहे.
This application, originally filed as RA&FD/R/2026/62579, was transferred onward to JGCLO/R/2026/80054. The Jalgaon office then stated that the "concerned office is not attached/listed on the RTI Online portal system," and directed the applicant to submit the same application physically/offline with the concerned public authority. An appeal against this response has now been filed as JGCLO/A/2026/60051.
मूळ माहिती देण्याऐवजी अर्ज transfer, नंतर "पोर्टलवर कार्यालय नाही" असे कारण देऊन ऑफलाइनकडे ढकलले. अपील प्रलंबित — पोर्टलवरील स्थिती पहा → Instead of furnishing information, the application was transferred, then pushed to offline filing citing "office not on portal." Appeal pending — view portal status →
RA&FD/R/2026/62491
दि. १४/०६/२०२६
Dt. 14/06/2026
उत्तर नाही No Response
विभाग: महसूल व वनविभाग · SPIO: SPIO DESK R3
Department: Revenue and Forest Department · SPIO: SPIO DESK R3
पुनर्वसन टप्पा २, प्लॉट क्र. ७३ ला ULPIN का नाही — बाकी सर्व भूखंडांना ULPIN असताना
Why does Punarvasan Tappa 2, Plot No. 73 have no ULPIN — when all other plots have ULPIN assigned
प्रस्तावित पाठपुरावा RTI
Follow-up RTI (Proposed)
एकसारख्या उत्तर पत्रांबाबत — DySLR जळगाव व उप अधीक्षक, मुक्ताईनगर
Re: identical response letters — DySLR Jalgaon & Deputy Superintendent, Muktainagar
तयारी सुरू In Preparation
विषय: दि. २३/०६/२०२६ व २४/०६/२०२६ रोजीच्या दोन्ही उत्तर पत्रांमागील प्रारूप/सूचना व मोजणी प्रश्नाच्या स्वतंत्र तपासणीबाबत माहिती
Subject: information on the template/instruction behind both response letters dated 23/06/2026 and 24/06/2026, and whether the demarcation request was separately examined
मागणी: (अ) दोन्ही उत्तरे तयार करणाऱ्या अधिकाऱ्यांचे नाव व पदनाम; (ब) दोन्ही कार्यालयांना समान प्रारूप/परिपत्रक/सूचना देण्यात आली होती का, असल्यास प्रत; (क) मूळ अर्जातील मोजणी (सीमांकन) मागणीची स्वतंत्रपणे तपासणी झाली का, त्यासंबंधी फाईल नोंद वा आदेश.
Requesting: (a) name and designation of the officer(s) who drafted each response; (b) whether a common template/circular/instruction was issued to both offices, and a copy if so; (c) whether the demarcation request in the original application was examined separately, with the relevant file noting or order.
एक लक्षात घेण्याजोगी गोष्ट
Something worth noting

RTI अर्ज क्र. RA&FD/R/2026/62579 मध्ये पुनर्वसन टप्पा २, प्लॉट क्र. ६९, ७०, ७१, ७२, ७४ व ७५ च्या मोजण्यांची माहिती मागितली — पुनर्वसन टप्पा २, प्लॉट क्र. ७३ जाणीवपूर्वक वगळला. कारण — जर सरकार सांगतं की पुनर्वसन टप्पा २ मध्ये कोणाचीच अधिकृत मोजणी नाही, तर शेजारील भूखंडांबाबत उत्तर येईल तेव्हा ती माहितीच सगळ्यात मोठा पुरावा ठरेल.

RTI application RA&FD/R/2026/62579 requested survey information for Punarvasan Tappa 2, Plot No. 69, 70, 71, 72, 74 and 75 — Punarvasan Tappa 2, Plot No. 73 was deliberately excluded. Reason — if the government says no official survey exists in Punarvasan Tappa 2, then when the response arrives regarding neighbouring plots, that information itself will become the most powerful evidence.

तक्रार पोर्टलपाठोपाठ — आता RTI यंत्रणेतही तोच नमुना?
After the Complaint Portal — Now the Same Pattern in the RTI System Too?

RA&FD/R/2026/62579 हा अर्ज उत्तर न देता प्रथम JGCLO/R/2026/80054 कडे transfer करण्यात आला, आणि नंतर "संबंधित कार्यालय पोर्टलच्या यादीत नाही, अर्ज ऑफलाइन करा" असे सांगून अर्जदाराला पुन्हा प्रक्रिया सुरू करण्यास भाग पाडले गेले — तेच कार्यालय ज्याच्याकडून प्रत्यक्षात माहिती अपेक्षित आहे. Aaple Sarkar तक्रार पोर्टलवर जसा "तोच PDF वारंवार अपलोड" हा नमुना आढळला, तसाच एक विलंब/टाळाटाळीचा नमुना आता RTI Online प्रणालीतही दिसतो आहे — यामुळे उप अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय, मुक्ताईनगर (DySLR) माहिती अधिकार प्रक्रियेतही जाणीवपूर्वक विलंब/टाळाटाळ करत असल्याची शंका बळावते.

Application RA&FD/R/2026/62579 was left unanswered, first transferred to JGCLO/R/2026/80054, and then the applicant was told the "concerned office is not listed on the portal, file offline instead" — regarding the very office the information was sought from. Just as the "same PDF re-uploaded repeatedly" pattern was found on the Aaple Sarkar complaint portal, a similar delay/deflection pattern now appears in the RTI Online system as well — reinforcing the suspicion that the Deputy Superintendent Land Records Office, Muktainagar (DySLR) is deliberately delaying or deflecting the Right to Information process too.