सार्वजनिक दस्तऐवजीकरण · जमीन हक्क · महाराष्ट्र Public Documentation · Land Rights · Maharashtra

मी दिनकर रामभाऊ नारखेडे.
माझ्या जमिनीसाठी न्याय मागतो.
I am Dinkar Rambhau Narkhede.
I seek justice for my land.

वय ७०. वरिष्ठ नागरिक व भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयाच्या आस्थापनेतील सेवानिवृत्त कर्मचारी. पुनर्वसन टप्पा २, प्लॉट क्र. ७३, मुक्ताईनगर, जळगाव — या जमिनीचा कायदेशीर मालक. २९ वर्षे शांततेत राहिलो. आज अतिक्रमणाविरुद्ध एकट्याने लढतो आहे. Age 70. Senior citizen and retired employee of a Ministry of Defence establishment, Government of India.. Legal owner of Punarvasan Tappa 2, Plot No. 73, Muktainagar, Jalgaon. 29 years of peaceful ownership. Today, fighting alone against encroachment.

२९
वर्षे कायदेशीर मालकी
Years of legal ownership
१००० चौ फूट
प्रत्यक्ष उपलब्ध (अपेक्षित २००० चौ फूट)
Actual frontage (expected 2000 sqft)
१९
तक्रारी (१५) + RTI (४) — शून्य निष्पक्ष चौकशी
Complaints (15) + RTIs (4) — zero impartial inquiry

२९ वर्षे. एक स्वप्न. आणि आता — फक्त न्यायाची प्रतीक्षा. 29 years. One dream. And now — only waiting for justice.

आयुष्यभर प्रामाणिकपणे शासकीय सेवा केली. शिस्त, इमानदारी, कर्तव्यनिष्ठा आणि संयम — हीच माझी ओळख राहिली. निवृत्तीनंतर स्वतःच्या जमिनीवर शांतपणे उर्वरित आयुष्य व्यतीत करण्याचे स्वप्न होते. आज, वयाच्या सत्तराव्या वर्षी, त्याच जमिनीसाठी न्यायाची लढाई लढावी लागत आहे.

I devoted my life to honest public service. Discipline, integrity, duty, and patience defined who I am. After retirement, my only wish was to spend the rest of my life peacefully on my own land. Today, at the age of seventy, I find myself fighting for justice to protect that very land.

१९९७ साली मी पुनर्वसन टप्पा २, प्लॉट क्र. ७३, मुक्ताईनगर, जळगाव येथे भूखंड कायदेशीरपणे विकत घेतला. ७/१२ उतारा, खरेदीखत, Index II — सर्व कागदपत्रे माझ्याकडे आहेत. २९ वर्षे शांततेत राहिलो. कधी कोणाशी वाद नाही.

In 1997, I legally purchased Punarvasan Tappa 2, Plot No. 73, Muktainagar, Jalgaon. 7/12 extract, Sale Deed, Index II — all documents in my possession. For 29 years, I lived peacefully. No disputes. No encroachments.

"मी अंबरनाथला राहतो. पुनर्वसन टप्पा २, प्लॉट क्र. ७३ वर रोज जाणं शक्य नाही. हे कोणाला तरी माहीत होतं." "I live in Ambernath. I cannot visit Punarvasan Tappa 2, Plot No. 73 every day. Someone knew this."

इथे एक महत्त्वाचा प्रश्न उरतो.Here lies the most important question.

DySLR मुक्ताईनगर यांनी स्वतः अधिकृत पत्रात मान्य केलं — पुनर्वसन टप्पा २ मध्ये अधिकृत मोजणीच झालेली नाही. कोणत्याही भूखंडाची हद्द अधिकृतपणे निश्चित नाही.

DySLR Muktainagar officially confirmed in writing — no authorised survey has ever been conducted in Punarvasan Tappa 2. No plot boundary has ever been officially fixed.

मग शेजारच्या भूखंडधारकांनी हद्द कशाच्या आधारे ठरवली? कोणत्याही सरकारी मोजणीशिवाय. कोणत्याही अधिकृत नकाशाशिवाय. फक्त — स्वतःच्या सोयीनुसार.

So on what basis did the neighbouring plot holders fix their boundaries? No government survey. No official map. Simply — as per their own convenience.

ज्याने जितकी जागा अडवली — तितकी त्याची झाली. जो दूर राहिला, जो बाहेरगावचा होता — त्याची जागा हळूहळू कमी होत गेली. आणि तो होतो मी — पुनर्वसन टप्पा २, प्लॉट क्र. ७३ चा कायदेशीर मालक.

Whoever occupied more — kept it. Whoever was far away, whoever was an outsider — their land kept shrinking. That person was me — the legal owner of Punarvasan Tappa 2, Plot No. 73.

आधी असे नव्हते... हे सगळे बदल गेल्या काही वर्षांत झाले आहेत.. It wasn't like this before... Many of these changes have happened in recent years.

DySLR मुक्ताईनगर यांनी स्वतः अधिकृत पत्रात मान्य केलं — पुनर्वसन टप्पा २ मध्ये अधिकृत मोजणीच झालेली नाही. कोणत्याही भूखंडाची हद्द अधिकृतपणे निश्चित नाही.

DySLR Muktainagar officially confirmed in writing — no authorised survey has ever been conducted in Punarvasan Tappa 2. No plot boundary has ever been officially fixed.

पुनर्वसन टप्पा २ — प्लॉट ६९ ते ७५ टेप मोजमाप इन्फोग्राफिक

सरकार स्वतःच सांगतं. The government itself admits it.

जून २०२६ मध्ये उप अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय, मुक्ताईनगर यांनी अधिकृत पत्रात ८ प्रश्नांची उत्तरे दिली. ती उत्तरे स्वतःच सगळं सांगतात —

In June 2026, the Deputy Superintendent Land Records Office, Muktainagar answered 8 questions in an official letter. The answers speak for themselves —

प्रश्न: पुनर्वसन टप्पा २, प्लॉट क्र. ७३ डिजिटल जमीन अभिलेख प्रणालीमध्ये आहे का?
उत्तर: तूर्त नाहीAnswer: Not at present
प्रश्न: ULPIN निर्माण झाला आहे का?
उत्तर: सध्या नाहीAnswer: Not yet
प्रश्न: एकट्या भूखंडाची मोजणी होऊ शकते का?
उत्तर: नाही — संपूर्ण टप्प्याची एकत्र मोजणी आवश्यकAnswer: No — a collective area-wide survey of all plots is required
प्रश्न: ULPIN साठी कोणतं कार्यालय सक्षम आहे?
उत्तर: याबाबत माहिती उपलब्ध नाहीAnswer: Information not available at this office
प्रश्न: तक्रार निवारण होईल का?
उत्तर: तक्रार काळी टाकण्यात येत आहेAnswer: Application is being set aside

संदर्भ: क्र. भूमापन/मौजे मु.नगर/ग नं ७३/टप्पा क्र२/२०२६ — दि. २३/०६/२०२६ · पूर्ण पत्र पाहा →

Ref: भूमापन/मौजे मु.नगर/ग नं ७३/टप्पा क्र२/२०२६ — Dt. 23/06/2026 · View full letter →

दि. ११/०७/२०२६ रोजी आणखी दोन तक्रारींना मिळालेल्या उत्तरांत DySLR कार्यालयाने आणखी दोन गंभीर बाबी लेखी मान्य केल्या — भूखंड क्र. ७४ ची हद्द अद्याप निश्चित झालेली नाही, आणि ऑनलाईन प्रणालीत "भूखंड क्रमांक" ऐवजी "गट क्रमांक" नोंदवला गेला. पुरावा ५ पाहा → · पुरावा ६ पाहा →

In replies to two further complaints received on 11/07/2026, the DySLR office admitted, in writing, two more serious facts — the boundary of Plot No. 74 has still not been fixed, and its online system recorded a "Gut Number" instead of a "Plot Number." See Evidence 5 → · See Evidence 6 →

१५ तक्रारी. ४ RTI. एकदाही निष्पक्ष चौकशी नाही. 15 Complaints. 4 RTIs. Not one impartial inquiry.

खाली दिलेली मूळ ८ नोंदी सुरुवातीच्या तक्रारी व RTI दाखवतात. त्यानंतर, दि. २४/०६/२०२६ पासून आजपर्यंत, याच प्रकरणात संपूर्ण महसूल साखळीत — तालुका, जिल्हा, उपविभाग, आयुक्त व विभागीय आयुक्त, नाशिक — असे आणखी ११ तक्रारी दाखल कराव्या लागल्या. यापैकी दोन तक्रारींना (Token 123 व Token 4) दि. ११/०७/२०२६ रोजी प्रथमच तपशीलवार लेखी उत्तर मिळाले — परंतु त्या उत्तरांतही मूळ मागणी (हद्द निश्चिती व एकत्र मोजणी) अद्याप अनुत्तरितच आहे. The original 8 entries below show the early complaints and RTIs. After that, from 24/06/2026 to date, 11 further complaints had to be filed in the same matter across the entire revenue hierarchy — Taluka, District, Sub-Division, Commissioner, and Divisional Commissioner, Nashik. Two of these (Token 123 and Token 4) finally received detailed written replies on 11/07/2026 — but even those replies leave the core demand (fixing the boundary, conducting a collective survey) unanswered.

१५
तक्रारी दाखल
Complaints filed
RTI अर्ज
RTI applications
२ / १५
तपशीलवार उत्तर मिळाले — तरीही निराकरण नाही
Got a detailed reply — still unresolved
कार्यालये, एकच शब्दशः उत्तर
Offices, one identical answer
०५ जून २०२६
RTI — RA&FD/R/2026/62334
मोजणी क्र. ७४५ ची सर्व कागदपत्रे मागितली
RTI for all documents of Survey No. 745
उत्तर नाही No response
०९ जून २०२६
TAL/REVD/MUKT/2026/1
तहसीलदार — अतिक्रमण व मोजणीची मागणी
Tehsildar — Encroachment & survey demand
उत्तराशिवाय "Resolved" Marked "Resolved" without answering
१० जून २०२६
RTI — JGCLO/R/2026/60303
पुनर्वसन टप्पा २ चा Layout Plan मागितला
RTI for Layout Plan of Punarvasan Tappa 2
उत्तर नाही No response
१४ जून २०२६
RTI — RA&FD/R/2026/62491
पुनर्वसन टप्पा २, प्लॉट क्र. ७३ ला ULPIN का नाही?
Why does Punarvasan Tappa 2, Plot No. 73 have no ULPIN?
उत्तर नाही No response
१८ जून २०२६
RTI — RA&FD/R/2026/62579
१९९० पासून पुनर्वसन टप्पा २, प्लॉट क्र. ६९ ते ७५ च्या सर्व मोजण्यांची माहिती
All surveys of Punarvasan Tappa 2, Plot No. 69–75 from 1990 to date
JGCLO/R/2026/80054 कडे transfer → "कार्यालय पोर्टलवर नाही, ऑफलाइन अर्ज करा" असे उत्तर → आता JGCLO/A/2026/60051 अपील दाखल. Closed without information→
Transferred to JGCLO/R/2026/80054 → told "office not on portal, file offline" → now appealed as JGCLO/A/2026/60051. View portal status →
Closed Transferred → Appealed - Closed
१९ जून २०२६
TAL/REVD/MUKT/2026/3
मोजणी रद्द व सखोल चौकशीची मागणी
Demand to cancel survey & conduct inquiry
उत्तराशिवाय बंद Closed without response
३० जून २०२६
DIS/REVD/JALG/2026/123
जिल्हाधिकारी — चुकीचा गट नंबर, नोटीस न मिळणे
Collector — Wrong gut number, no notice given
दि. ११/०७/२०२६ रोजी तपशीलवार उत्तर मिळाले — त्यातच भूखंड क्र. ७४ ची हद्द अद्याप निश्चित न झाल्याची कबुली (मुद्दा ६) — तरीही तक्रार निकाली काढण्यात आली. पुरावा पहा →
Received a detailed reply on 11/07/2026 — which itself admits (Point 6) that Plot No. 74's boundary has still not been fixed — yet the complaint was closed anyway. See evidence →
उत्तर मिळाले — तरीही निराकरण नाही Replied — but grievance not resolved
११ जुलै २०२६
DIS/REVD/JALG/2026/4
जिल्हाधिकारी — गट नंबर वि. भूखंड क्रमांक, वहिवाट-आधारित मोजणी
Collector — Gut number vs. plot number, possession-based survey
याच दिवशी दाखल झालेल्या दुसऱ्या तक्रारीला मिळालेल्या उत्तरात, विभागाने स्वतः लेखी मान्य केले की ऑनलाईन प्रणालीत "भूखंड क्रमांक" ऐवजी "गट क्रमांक" नोंदवला गेला. पुरावा पहा →
In its reply to this separate complaint filed the same day, the department admitted in writing that its online system recorded a "Gut Number" instead of a "Plot Number." See evidence →
उत्तर मिळाले — तरीही निराकरण नाही Replied — but grievance not resolved
२४ जून २०२६
TAL/REVD/MUKT/2026/4
मागील तक्रार उत्तराशिवाय बंद — पुन्हा नवीन तक्रार
Previous complaint closed without answer — fresh complaint filed
Appealed — तेच PDF पुन्हा अपलोड Appealed — same PDF re-uploaded
२४ जून – ०३ जुलै २०२६
24 Jun – 03 Jul 2026
आणखी ११ तक्रारी — संपूर्ण महसूल साखळीत
11 more complaints — across the entire revenue hierarchy
TAL/REVD/MUKT/2026/5 व /6, DIS/REVD/JALG/2026/4, 121, 123, 132, 134, 136, SUB/REVD/BHUS/2026/2, COM/REVD/2026/613, DIV/REVD/NASH/2026/209 — तालुका ते विभागीय आयुक्त, नाशिक स्तरापर्यंत पोहोचले.
TAL/REVD/MUKT/2026/5 & /6, DIS/REVD/JALG/2026/4, 121, 123, 132, 134, 136, SUB/REVD/BHUS/2026/2, COM/REVD/2026/613, DIV/REVD/NASH/2026/209 — escalated all the way to the Divisional Commissioner, Nashik.
एकही निष्पक्ष चौकशी नाही Not one impartial inquiry
तालुकाTaluka जिल्हाDistrict उपविभागSub-Division आयुक्तCommissioner विभागीय आयुक्त, नाशिक Divisional Commissioner, Nashik
वरिष्ठ स्तरावरील स्वतंत्र चौकशीची मागणी
Demand for an Independent, Senior-Level Inquiry

अधिक तक्रारी संपूर्ण महसूल साखळीत (तालुका → जिल्हा → उपविभाग → आयुक्त → विभागीय आयुक्त) दाखल — तरीही त्या जागी अद्याप एकही निष्पक्ष चौकशी झालेली नाही. सुरुवातीच्या अनेक तक्रारी Muktainagar DySLR व तहसीलदार कार्यालयाने तोच PDF अपलोड करून बंद केल्या. दि. ११/०७/२०२६ रोजी दोन तक्रारींना (Token 123 व Token 4) प्रथमच वेगळी, तपशीलवार लेखी उत्तरे मिळाली — पण त्या उत्तरांतही विभागाने स्वतःच गंभीर त्रुटी (चुकीचा गट नंबर, हद्द निश्चित नसणे) मान्य करूनही तक्रार निकाली काढून टाकली, प्रत्यक्ष निराकरण केले नाही. यामुळे वरिष्ठांची दिशाभूल होत असल्याची शंका कायम आहे. ही चौकशी वरिष्ठ स्तरावरील पथकानेच करावी अशी अर्जदाराची इच्छा आहे — स्थानिक स्तरावरील अधिकारी "मॅनेज" असल्याची शंका उपस्थित झाली आहे.

Further complaints have been filed across the entire revenue hierarchy (Taluka → District → Sub-Division → Commissioner → Divisional Commissioner) — yet not one impartial, on-ground inquiry has taken place there to date. Many of the earlier complaints were closed by the Muktainagar DySLR and Tahsildar's office uploading the same PDF. On 11/07/2026, two complaints (Token 123 and Token 4) finally received distinct, detailed written replies — but even in those replies, despite admitting serious irregularities itself (wrong gut number, boundary never fixed), the department closed the complaints without actually resolving them. This keeps alive the doubt that senior officers are being kept misled. The applicant's wish is that this inquiry be conducted specifically by a senior-level team — a suspicion has arisen that the local-level officer is being "managed."

आता RTI अर्ज RA&FD/R/2026/62579 देखील उत्तर न देता transfer करून, नंतर "कार्यालय पोर्टलवर नाही" असे सांगून ऑफलाइनकडे ढकलण्यात आला — Muktainagar DySLR माहिती अधिकार प्रणालीतही असाच टाळाटाळीचा नमुना अवलंबत असल्याची शंका बळावते. संपूर्ण तपशील पहा →

RTI application RA&FD/R/2026/62579 has likewise gone unanswered — transferred instead, then pushed toward offline filing citing "office not on portal" — reinforcing the suspicion that the Muktainagar DySLR is applying the same deflection pattern to the RTI process too. See full details →

सर्व १४ तक्रारी व ४ RTI चा संपूर्ण तपशील पाहा → View complete details of all 14 complaints & 4 RTIs →

मी हात जोडतो. I fold my hands and ask.

मी भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयाच्या आस्थापनेतून सेवानिवृत्त निवृत्त झालो. देशाची सेवा केली. कधी कोणाची जमीन घेतली नाही. कधी कोणाशी वाद केला नाही. आज माझ्या स्वतःच्या जमिनीसाठी — पुनर्वसन टप्पा २, प्लॉट क्र. ७३ साठी — वयाच्या ७० व्या वर्षी एकट्याने लढतो आहे. I retired from an establishment of the Ministry of Defence, Government of India. I served this country. I never took anyone's land. I never picked a fight. Today, for my own land — Punarvasan Tappa 2, Plot No. 73 — I fight alone at the age of 70.

एकच मागणी:
पुनर्वसन टप्पा २, प्लॉट क्र. ६९ ते ७५ ची अधिकृत एकत्र मोजणी करण्यात यावी. माझ्या भूखंडाच्या खऱ्या हद्दी निश्चित कराव्यात. माझ्या मालकी हक्काचं संरक्षण करावं.
One demand only:
Conduct an official collective survey of Punarvasan Tappa 2, Plot No. 69 to 75. Fix the true boundaries of my plot. Protect my ownership rights.
संपर्क माहिती पाहा → View contact information →