२९ वर्षे. एक स्वप्न. आणि आता — फक्त न्यायाची प्रतीक्षा. 29 years. One dream. And now — only waiting for justice.
आयुष्यभर प्रामाणिकपणे शासकीय सेवा केली. शिस्त, इमानदारी, कर्तव्यनिष्ठा आणि संयम — हीच माझी ओळख राहिली. निवृत्तीनंतर स्वतःच्या जमिनीवर शांतपणे उर्वरित आयुष्य व्यतीत करण्याचे स्वप्न होते. आज, वयाच्या सत्तराव्या वर्षी, त्याच जमिनीसाठी न्यायाची लढाई लढावी लागत आहे.
I devoted my life to honest public service. Discipline, integrity, duty, and patience defined who I am. After retirement, my only wish was to spend the rest of my life peacefully on my own land. Today, at the age of seventy, I find myself fighting for justice to protect that very land.
१९९७ साली मी पुनर्वसन टप्पा २, प्लॉट क्र. ७३, मुक्ताईनगर, जळगाव येथे भूखंड कायदेशीरपणे विकत घेतला. ७/१२ उतारा, खरेदीखत, Index II — सर्व कागदपत्रे माझ्याकडे आहेत. २९ वर्षे शांततेत राहिलो. कधी कोणाशी वाद नाही.
In 1997, I legally purchased Punarvasan Tappa 2, Plot No. 73, Muktainagar, Jalgaon. 7/12 extract, Sale Deed, Index II — all documents in my possession. For 29 years, I lived peacefully. No disputes. No encroachments.
इथे एक महत्त्वाचा प्रश्न उरतो.Here lies the most important question.
DySLR मुक्ताईनगर यांनी स्वतः अधिकृत पत्रात मान्य केलं — पुनर्वसन टप्पा २ मध्ये अधिकृत मोजणीच झालेली नाही. कोणत्याही भूखंडाची हद्द अधिकृतपणे निश्चित नाही.
DySLR Muktainagar officially confirmed in writing — no authorised survey has ever been conducted in Punarvasan Tappa 2. No plot boundary has ever been officially fixed.
मग शेजारच्या भूखंडधारकांनी हद्द कशाच्या आधारे ठरवली? कोणत्याही सरकारी मोजणीशिवाय. कोणत्याही अधिकृत नकाशाशिवाय. फक्त — स्वतःच्या सोयीनुसार.
So on what basis did the neighbouring plot holders fix their boundaries? No government survey. No official map. Simply — as per their own convenience.
ज्याने जितकी जागा अडवली — तितकी त्याची झाली. जो दूर राहिला, जो बाहेरगावचा होता — त्याची जागा हळूहळू कमी होत गेली. आणि तो होतो मी — पुनर्वसन टप्पा २, प्लॉट क्र. ७३ चा कायदेशीर मालक.
Whoever occupied more — kept it. Whoever was far away, whoever was an outsider — their land kept shrinking. That person was me — the legal owner of Punarvasan Tappa 2, Plot No. 73.